धाराशिव (सतीश राठोड) :- देशभक्ती और समाजसेवा फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खुदावाडी सह परिसरातील क्रिकेटप्रेमी नागरिकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दीपावली सणाचे औचित्य साधून देशभक्ती और समाजसेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय चेअरमन व भाजपाचे युवा नेते राहुल भैया चव्हाण यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रांत धर्माचार्य सह संपर्कप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन प्रांत धर्माचार्य सह संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्राचे नागनाथ बोंगरगे, स्वयंसेवक संघाचे संग्राम पाटील, ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार यांच्या सह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.




