तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरी मध्ये तुळजापूर नगर परिषद मार्फत वैशिष्टयपुर्ण योजना सन 2024-2025 अंतर्गत एकुण 23 विकास कामे चालु असुन सदरील कामे जाहिर ई-निविदाच्या अ.क्र. 15 च्या अनुषंगाने एक अट अशी होती की, सदरील कामे हे RMC प्लाँट द्वारेच करुन घ्यावीत जेणेकरुन कामाची गुणवत्ता ही चांगल्या दर्जाची होतील. आणि कामापासुन RMC प्लँट हा 15 कि.मी. च्या आत असावा अशी अट होती. परंतु सदरील कामे सध्या स्थितीमध्ये RMC प्लँटचा वापर न करता हात पलटी वरुन, कामे करुन घेण्यात येत असुन तसेच दगड मिक्स, दगडाचा चुरा, कमी सिमेंट वापरुन निकृष्ट व बोगस दर्जाची कामे सध्या तुळजापूर शहरात जोमात चालु असुन तसेच निवेदामध्ये अ.क्र. 21 (A to H) या प्रमाणे नियम व अटी धाब्यावर बसवुन बोगसगिरी कामे करीत आहेत.
तसेच सदरील शिष्टयपुर्ण योजना सन 2024-2025 अंतर्गत एकुण 23 विकास कामे बोगस व निकृष्ट दर्जाचे चालु असुन तसेच कोठेतरी शासनाची आणि तुळजापूरच्या जनतेची फसवणुक होत आहे. त्यामुळे या कामाचे गुत्तेदार, संजय आण्णाप्पा पवार व RMC यांना काळ्या यादीत टाकुन ते कामे त्वरीत टरमेनेट करुन घेण्यात यावेत. व चालु कामे त्वरीत थांबविण्यात यावे व त्याची देयके हि थांबविण्यात यावेत असे प्रतिपादन निवेदनात केले आहे.
तुळजापूर नगर परिषद मार्फत वैशिष्टयपुर्ण योजना सन 2024-2025 अंतर्गत एकुण 23 विकास कामे चालु असुन त्या कामाच्या निविदेमध्ये दिलेल्या नियम व अटी चे उलंघन करुन बोगस व निकृष्ट दर्जाचे कामे त्वरीत बंद करण्यात यावेत. अन्यथा नाईलाजास्तव महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर महाविकास आघाडी व घटक पक्षांचे अमोल कुतवळ ,रणजीत इंगळे,आनंद नानासाहेब जगताप, शरद जगदाळे ,सुधीर कदम , राहुल खपले , तोफिक शेख , श्याम पवार ऋषिकेश मगर , अमर चोपदार ,अक्षय कदम ,भरत जाधव ,उत्तम नाना अमृतराव,किरण यादव ,बालाजी तट ,कदम बाळासाहेब, नवनाथ जगताप अण्णासाहेब मगर आदि यांच्या सह्या आहेत.




