spot_img
spot_img

शोएब खाटीक यांना यश .अल्पसंख्यांक आयोगाचा दणका !

७ दिवसाच्या आत कारवाई करून अहवाल पाठवण्याचे आदेश

नगर – नगर जिल्ह्यात मागील काही महिन्यात सतत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याने आणि कोणत्याही कार्यक्रमात मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजा विरोधात आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या नगरचे आमदार संग्राम जगताप यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाने नगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले आहे. मुस्लिम समाज विरोधात सतत आक्षेपर्य वक्तव्य करणारे आणि जवखेड खालसा येथे न्यायालयाचा मनाई आदेश असताना आमदार संग्राम जगताप यांच्यासह जातीवादी संघटनेने दर्ग्यात घुसून दर्ग्याच्या विटंबना करून कब्जा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे *अल्पसंख्याक विकास मंडळाचे शोएब खाटीक* आणि समस्त मुस्लिम जमात ट्रस्टचे *डॉ परवेज अशरफी* यांनी महाराष्ट्र *अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान साहेब* यांच्या कडे तक्रार केली होती. सदर तक्रार अल्पसंख्यांक समाजाशी निगडित असल्याने आयोगाने याचा गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना कारवाई करून आदेशा ७ दिवसाच्या आत पाठवण्याचे आदेश दिले आहे. नाही तर राज्य अल्पसंख्यांक आयोग २०१२ कलम १० (क) नुसार सुनावणी ठेऊन सर्व संबंधितांना आयोग समोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येईल, याची नोंद जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक सांगितले आहे.आता नगर जिल्हा पोलिस अधिक्षक आणि जिल्हा अधिकारी यांची भूमिके कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!