बीड- बीड पंचक्रोशीतील हजारो महिलांना सबलीकरण आणि महिलांना संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या गृहउद्योग योजनांच्या नावाखाली फूस लावून लाखो रुपयांची बीड येथील संस्था आणि सदर जिल्ह्यातील महिलांची आर्थिक लूट करणारा नामे अमोल वाघमारे हा इसम बीड जिल्ह्यातील ज्युनिअर तेलगी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
सदर व्यक्तीबद्दल संस्थेने MPID कायदा (Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999) या अंतर्गत १८ जून २०२५ तक्रार दाखल केली आहे.
सदर व्यक्तीबद्दल संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार नामे अमोल वाघमारे हा गेली दीड वर्ष संस्थेकडून महिलांच्या सबलीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेत होता त्यामध्ये महिलांना शिलाई मशीन,गोधडी व्यवसाय, कुक्कुटपालन,शिवणकाम तसेच अनेक योजना ह्या संस्थेकडून घेऊन याच योजना सदर बीड जिल्ह्यातील हजारो महिलांना अधिक पैशाचे आमिष दाखवून महिलांना योजनेच्या नोंदणी करण्यासाठी पैसे जमा करण्यास सूरवात केली आणि लाखो रुपयांची फसवणूक करून काढता पाय घेतला . योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी संपर्क साधण्यास सुरवात केली असता उडवा उडवीची उत्तरे व करणे देण्यास सुरुवात केली तद्नंतर महिलांना सदर व्यक्तीकडून संस्थेचा सम्पर्क क्रमांक देण्यास सुरुवात केली. सदर घटनेची माहिती संस्थेस मिळाली असता संस्थेने त्वरित कारवाई सुरवात केली असता संस्थेच्या मुख्य प्रमुखांना व त्यांच्या परिवारास जीवे मारण्याची तथा घर जाळून धमकी देण्यात आली.
सदर व्यक्तीने दिनाक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी बीड येथे ५०० महिलांकडून संस्थेची खोटी प्रमाणपत्रे वाटून अंदाजे १० लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम गोळा केली असून याची कल्पना कोणालाही दिलेली नाही. दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ बीड येथे झालेल्या महिला आर्थिक सक्षमीकरण या प्रकल्पाचे मानधन सदर व्यक्लीने संस्थेला पाठविले नाही तसेच या लोकांकडून मात्र त्याने पैसे उकळले आहेत. त्याचप्रमाणे मिटर के वाय सी सर्व्हसाठी आम्ही मुलांच्या नोंदी करत होतो, त्यामध्येही ३ लाख रुपयांचा अपहार केला असून आता त्या लाभार्थी लोकांचे फोन घेणे त्याने बंद केले आहेत.
महिला सबलीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी दळणवळण करण्यास संस्थेकडून त्यांना वोल्क्स वॅगन पसाट वाहन दळणवळणासाठी दिले होते. वारंवार परत देणेबाबत बोलले असता सदर व्यक्ती कारणे देण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहिती प्रमाणे त्याने ती गाडी त्याचे दाजी (थेऊर फाटा) याना गैरपद्धतीने विकली आहे. वाहनाची किंमत साधारण ७ लाख इतकी आहे.
दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी ह्युंदाई क्ससेन्ट वाहन क्रमांक MH १४ FC ४९२८ हे वाहन ननावरे यांकडून खरेदी करून दिली होती. हा व्यवहार रुपये २ लाख रुपये वरती झाला होता. सर्व रक्कम घेऊन ती ननावरे याना दिली नसून अजून ती गाडी माझ्या नवे झालेली नाही. दिनांक १७ जून २०२५ रोजी त्यांकडे चौकशी केली असता तुला काय करायचे ले कर तुला जिवंत सोडल नाही अशी धमकी त्याने संस्थेच्या प्रमुखास दिली.
महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये ५००० रुपये शिलाई मशीन व ५००० रुपये एम्ब्रॉयडरी मशीन असा एक नवीन स्कॅम सध्या तो संस्थेचे नाव वापरुन राबवत आहे. याचे सबळ पुरावे संस्था प्रमुखांकडे आहेत. तसेच या आगोदर समाजामध्ये मोफत वाटपासाठी दिलेल्या साहित्याचीही विक्री त्यांचेकडून झाली आहे.
सदर व्यक्तीकडे सध्या २५ कोंबडी शेत अंदाजे रक्कम लाख रुपये, शिवणकाम सेटअप अंदाजे रक्क्म ५० हजार रुपये, बैंक तपशिलाप्रमाणे रुपये १२ लाख २३ हजार २९० रुपये एवढी रक्कम तसेच समाजातील कोलांचे आतापर्यत समजलेले रुपये ७ लाख एवढी रक्कम असून वारंवार तगादा लावूनही परतावा करत नाही. दिनांक १८ जून २०२५ रोजी घरी १०० लोक घेऊन येऊन तुझे घर परिवारासोबत पेटवतो अशी धमकी त्याने संस्था प्रमुखास दिली .
संपूर्ण मिळालेल्या माहितीवरून ऐकूण ४० लाख रुपयांची फसवणूक केली आहे ,ज्याची तक्रार पुणे येथील देहू पोलीस स्टेशन येथे दिली आहे. अमोल वाघमारे ह्या व्यक्तीवर त्वरीत कारवाई व्हावी जेणेकरून परत आशा घटनाना आळा बसेल असे आव्हावन संस्थेच्या प्रमुखाने केले आहे.




