spot_img
spot_img

जळकोट येथे माता रमाई व भिमराव आंबेडकर यांच्या लग्नाचा ११९ वा वाढदिवस मोठया आनंदाने साजरा करण्यात आला.

जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे युगपुरुष तरुण मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयत्ती उत्सव कमेटीच्या वत्तीने माता रमाई भिमराव उर्फ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लग्नाचा ११९ वा वाढदिवस मोठ्या आनंदी आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला
डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाईचे लग्न मुंबई येथील भायखळा भाजी मार्केट येथे दिनांक ४ एप्रिल १९०६ रोजी संपन्न झाला होता . त्या दिनाचे औचित्य साधून त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सुरुवातीस माता रमाई व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पुजन सुमन लोखंडे मनिषा गायकवाड रेषा सोनकोबळे लता माने यांच्या हस्ते दिप धूप प्रत्वलीत करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानतर सामुदायिक त्रिशरण पंचशिल व शरणतय गाथा घेण्यात आले त्यानंतर येथील जेष्ठ महिला सुमनबाई लोखंडे गोर्कनाबाई लोखंडे भारतबाई साखरे वैजंताबाई माने याच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी ज्योती लोखंडे सुकमार सोनकाबळे नगीना लोखंडे सोनल भालेराव जया माने जयश्री लोखंडे कांचन लोखंडे कविता लोखंडे कोमल माने मंगल गायकवाड शोभा लोखंडे बबीता लोखंडे प्रज्ञा माने सपना गायकवाड वर्षा गायकवाड जिजाबाई लोखंडे राधिका लोखंडे साधना लोखंडे भारतबाई लोखंडे मिना माने लता गायकवाड आशा लोखंडे जंयती मंडळाचे अध्यक्ष अरविंद लोखंडे लहू लोखंडे सतिश माने प्रदिप लोखंडे सह भिमनगर मधील बौद्ध उपासक उपासीका मोठ्या संख्येनं उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी फटाक्याची अतिषबाजी करण्यात येवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!