धाराशिव (सतीश राठोड ) :- बॉलीवूड सिनेस्टार अजय देवगन यांचा नळदुर्ग येथील युवा चाहता शंकर वाघमारे यांनी सिनेस्टार अजय देवगन यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ केला .
सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे . नळदुर्ग शहरात बाहेरगावाहून येणारे व्यापारी व प्रवासी नागरिकांसाठी मोफत थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बॉलीवूड सिनेस्टार अजय देवगन यांच्या वाढदिवसानिमित्त शंकर वाघमारे या युवा चहात्याने नळदुर्ग शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणपोई सुरू केली आहे. रामतीर्थ येथील श्रीराम मंदिराचे पुजारी शुक्ला महाराज यांच्या हस्ते पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विनायक अंहकारी , नवल जाधव , रणजीत डुकरे , अरुण ठाकूर , पिसिएमसी फॅन क्लब पुणे येथील कुणाल चंदनशिवे , गुलाब जाधव , पत्रकार सुनील गव्हाणे , गणेश मोरडे , सनी भुमकर , प्रवीण चव्हाण , खंडु बताले , संभाजी कांबळे , बाळू वाघमारे ,जयदिप वाघमारे, विक्रम भोसले ,नवल वाघमारे , विजय ठाकुर याची प्रमुख उपस्थिती होती. शंकर वाघमारे या युवा चाहत्याने श्रीराम मंदिराचे पुजारी शुक्ला महाराज यांचा सत्कार केला .सिनेस्टार अजय देवगन यांचा युवा चाहता शंकर वाघमारे यांनी गेल्या चोविस वर्षापासून बॉलीवूड सिनेस्टार अजय देवगन यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करीत असतो. यापुर्वी शंकर वाघमारे यांना मुंबई येथे भोला हिंदी चित्रपट ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमात बॉलीवूड सिनेस्टार अजय देवगन यांनी विशेष निमंत्रित करून रुद्राक्ष माळ भेट देऊन सन्मान देखिल केला आहे. नळदुर्ग येथील मुख्य बाजारपेठेत वाघमारे यांनी पाणपोई सुरू केल्याने कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना थंडगार पिण्याचे पाण्याची सोय झाल्याने नागरिकातून समाधान होत आहे .




