( तुळजापूर ) – श्री.क्षेत्र तुळजापूर येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा सत्कार महाविकास आघाडीकडून दि.२९ मार्च शनिवार रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष धिरज पाटील,
शिवसेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख शामभाऊ पवार ,
माजी नगरसेवक राहुल खपले तथा अमोल कुतवळ यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळी श्री क्षेत्र तुळजापूर शाहराच्या सर्वांगिण विकास कामा बाबत नूतन मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तुळजापुर तालुका महाविकास आघाडी कडून सर्वोत्तपरी सहकार्य आसेल म्हणून जाहीर केले .
परंतू शहराचा विकास व्हावा अशी अपेक्षाही व्यक्ती केली. प्रसंगी श्री मुख्याधिकारी यांनी शहराची स्वच्छता गृह आणि कार पार्किंग बाबत योग्य नियोजन करून सर्वांना विश्वासात घेऊन काम करू असे शेवटी अश्वस्त केले यावेळी
इतर कार्यकर्ते ही मोठया संख्येने उपस्थित होते.




