spot_img
spot_img

केंद्र सरकारच्या तुघलकी परिपत्रकामुळे बळीराजाचे नुकसान !

अहेमद शेख ( धाराशिव ) :

ऐन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात 30 एप्रिल 2024 रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यावर अन्यायकारक करणारे पिक विमा च्या बाबतीत परिपत्रक काढले असल्याने एकट्या धाराशिव जिल्ह्यातील 2023 मध्ये 900 कोटी व 2024 मध्ये 750 कोटी एकूण 1650 कोटी रुपयाचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या परिपत्रकामुळे मिळाली नसल्याने शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदरील परिपत्रक रद्द करावे अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या खासदारांच्या वतीने आज संसद भवनात केंद्रीय कृषिमंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण साहेब यांची धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमप्रकाशराजे दादा निंबाळकर यांनी तिसऱ्यांदा भेट घेऊन केली मागणी

या भेटीच्या वेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार डॉ शिवाजी काळगे, खासदार बळवंत वानखेडे,खासदार शोभा बच्छाव, खासदार कल्याण काळे देखील उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!