धाराशिव : कनेक्ट पिपल वाय एस डब्लू एफ संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान गेली काही वर्ष आयोजित केला जात आहे . गतवर्षीप्रमाणे याही वर्षी अहिल्यानागर येथे दि.२२जून २०२५ रोजी महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२५ आयोजित करण्यात आला होता.
जकात फाउंडेशन नळदुर्ग व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई यांच्या माध्यमातून गेली 7 वर्ष धाराशिव तथा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये पत्रकारिता आणि समाजसेवेत कार्यरत असून यांच्या संस्थेच्या महिला सशक्तीकरण आणि गृहउद्योग देण्याचे काम यांच्याकडून होत आहे त्याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातून समाजतील अनेक घटनांना वाचा फोडण्याचे काम यांच्याकडून होत आहे याचं कार्याची दखल घेऊन कनेक्ट पिपल वाय एस डब्लू एफ या संस्थेचे अध्यक्ष मा. प्रवीण कांबळे व उपाध्यक्ष व यशीष सोशल वेलफेअर फाउंडेशन चे संस्थापक मा. अभिजीत लोहार यांनी अहिल्यानागर येथे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमच्या वेळी मा. खासदार निलेश लंके यांच्या सौभाग्यवती मा. राणीताई लंके व सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.




