तुळजापूर – येथील दिनांक 20/12/2023 रोजी आपणास श्री क्षेत्र तुळजापूर येथील जुने बसस्थानक पाडुन तेथे जे नविन बसस्थानक करण्यात येत असुन सदरील काम हे वाळु न वापरता दगडापासुन बनविलेले माती मिक्स डस्ट वापरुन बांधकाम करीत असलेले निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. सदर निवेदनावर आजतागायत कोणतीही कार्यवाही झाले नाही तसेच वरील विषयाच्या अनुषंगाने तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालु असुन त्या कामामध्ये लोखंड हलक्या प्रतीचे वापरण्यात येत आहे. व त्याकामध्ये खालील प्रमाणे त्रुटी आहेत.
1. दोन्ही पाईपमधील वेल्डींग जॉईंट हे प्रॉपर नाहीत.
2. पाऊडशन बोल्ट प्रॉपर डिझाईन प्रमाणे नाहीत(पब्लीक प्लेस असल्याने ते हावेच्या, वारा वादळाच्या प्रेशरने ते केव्हाही पडु शकतात)
3. पाऊंडशन बोल्ट हे प्लेटच्या वरती नटबोल्ट नाहीत. प्लेटच्या बाहेर आर.सी.सी. कॉलम प्लेटच्या 80+80 पाहिजे. परंतु ते नसल्याने कॉलम तुटुन पडु शकतात.
4. 6 मीटरच्या पाईपला तुकडे जॉईंट होतो व 1 मीटर मध्ये 2 तुकडे जॉईंट स्ट्रक्चर अपरोल नाही.
5. 6 मीटरच्या पाईपला तुकडे जोडताना सिलीव्ह जॉईंट असतात परंतु एवढया मोठया स्टक्चर मध्ये इतके छोटे छोटे तुकडे जोडले आहेत की त्यामध्ये एकही सिव्हील जॉईंट नाही व प्रॉपर जॉईंट नाहीत.
6. दोन पाईपच्या मध्ये डिझाईन प्रमाणे असा जॉईंट असतो की त्याप्रमाणे जॉईंट दिसुन येत नाही.
7. पाऊंडेशन डिझाईन प्रमाणे काम केले नसुन सदरील कामाचे वरील 1 ते 7 प्रमाणे मुळ डिझाईन प्रमाणे काम होत नसुन सदरील काम हे वाजवी दरापेक्षा जास्त असुन ते काम निकृष्ट दर्जाचे काम चालु असुन उत्कृष्ट दर्जाचे काम होत नाही त्यामुळे आपली व महाराष्ट्र शासनाची दिशाभुल करुन थतर मतर काम करीत आहेत याबाबत आपल्या स्तरावर वरील संदर्भ व विषयास अनुसरुन चौकशी करुन संबंधितावर कायदेशीर कार्यवाही व संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा व श्री. क्षेत्र तुळजापुर येथील जुन्या बस स्टँडचे काम ईस्टिमेट प्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करणा-या नवीन एजन्सी मार्फत काम करण्यात यावे. याबाबत आपण वरील संदर्भ व विषयाच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी. जर भविष्यामध्ये या जुन्या बस स्टँड मध्ये पडझड किंवा जीवित हानी झाल्यास याला सर्वस्वी आपण स्वत: जबाबदार राहाल असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते.
याचप्रमाणे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून तुळजापूरात येतात. या भाविकांच्या सोयीसाठी जुने बसस्थानक पाडून तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून नवे आधुनिक बस स्थानक बांधण्यात आले. काही दिवसांपूर्वीच याचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले होते. मात्र अवकाळी पावसानेच या ‘आधुनिकते’चा फोलपणा उघड केला आहे. बस स्थानकाच्या छतावरून ठिकठिकाणी पाणी गळत असून, बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना व भाविकांना जागेवरच भिजत उभे राहावे लागत आहे. नव्या बस स्थानकातील ही स्थिती पाहता प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. इतक्या मोठ्या खर्चानंतरही निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे यावरून स्पष्ट होत असून, संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. तुळजाभवानी मातेच्या सेवेसाठी आलेल्या भाविकांना या पावसात त्रास सहन करावा लागत असताना, शासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी असे निवेदन शिवसेना उप जिल्हा प्रमुख शाम अंबादासराव पवार यांनी मा. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले आहे.




