spot_img
spot_img

इंडियात एन्ट्री करणार Tiguan R-Line आणि Golf GTI,जाणून घ्या कधी होणार लाँच

युरोपियन ऑटोमोबाईल उत्पादक फोक्सवॅगन इंडियन मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार विकते. कंपनी लवकरच आपला पोर्टफोलिओ वाढवण्याची तयारी करत आहे. फोक्सवॅगन कोणत्या सेगमेंटमध्ये कोणती कार लाँच करू करेल. या गाड्या भारतात कधी लाँच होतील? जाणून घेऊ सविस्तर…

कोणत्या सेगमेंटमध्ये येणार कार?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आणल्या जाणाऱ्या दोन नवीन कारपैकी एक पॉवरफूल आणि प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये आणली जाईल. ही कार फोक्सवॅगन गोल्फ जीटीआय असेल. त्यानंतर टिगुआन आर-लाइन, जी अनेक देशामध्ये फूल-साईज एसयूव्ही म्हणून लाँच केली जाईल.

इंडियात कधी होणार लाँच?

या दोन्ही कार पुढील 2 ते 3 महिन्यांत इंडियात ऑफिशियली लाँच केल्या जातील अशी माहिती कंपनीने दिली आहे.

पॉवरफूल इंजिनसह लाँच होणार दोन्ही कार्स?

रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कार दोन लिटर कॅपेसिटीच्या टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच केल्या जाऊ शकतात. Golf GTI 265 पीएसची पॉवर आणि 370 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करेल. तसेच टिगुआन आर-लाइनमध्ये दोन-लिटर कॅपेसिटीचे टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले जाईल. जे 190 पीएस पॉवर आणि 320 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. दोन्ही कारमध्ये 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन दिले जाईल. Golf GTI टू-व्हील ड्राइव्हसह ऑफर केली जाईल, तर Tiguan R-Line ऑल-व्हील ड्राइव्हसह ऑफर केली जाऊ शकते. बाकी डिटेल्स लाँचिंगच्या वेळी समोर येतील.

किती असू शकते किंमत?

Volkswagen Golf GTI आणि Volkswagen Tiguan R-Line ची किंमत लाँचिंगच्या वेळी समोर येईल. अंदाजानुसार Golf GTI किंमत 52 लाख आणि Tiguan R-Line ची किंमत 55 लाख रुपये असू शकते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!