लखनौ सुपर जायंट्सच्या जबड्यातून यावेळी दिल्लीसाठी सामना खेचून आणला तो आशुषोत शर्माने. दिल्लीने हा सामना गमावलाच होता. पण आशुतोषने दिल्लीच्या संघाला धावांची संजीवनी दिली आणि त्यामुळेच दिल्लीला हा सामना जिंकता आला. पण दिल्लीसाठी मॅचविनर ठरलेला आशुतोष शर्मा आहे तरी कोण, याची माहिती आता समोर आली आहे.
११ चेंडूंत अर्धशतक…
आशुषोत शर्मा हा प्रकाशझोतात तेव्हा आला जेव्हा त्याने फक्त ११ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो खेळाडू ठरला होता. हा सामना रंगला होता तो बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये. आशुतोष हा रेल्वेकडून खेळत होता आणि त्यांच्या समोर होता अरुणाचल प्रदेशचा संघ. या सामन्यात आशुतोषने फक्त ११ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
यापूर्वी आयपीएलमध्ये कोणत्या संघात होता आशुतोष…
आशुतोष हा काही पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत नाही. गेल्यावर्षी त्या पंजाब किंग्सने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापरला होता. त्यावेळी आशुतोषने चांगली फटकेबाजी केली होती, पण त्याला अशी मॅचविनिंग खेळी साकारता आली नव्हती. पण पंजाबच्या संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही आणि त्याला लिलावात सहभागी होता आले.
दिल्लीने किती पैसे मोजत आशुतोषला संघात स्थान दिले…
दिल्लीच्या संघाने यावेळी आशुतोषला संघात घेण्यासाठी जास्तच मेहनत घेतली. कारण आशुतोषची मूळ किंमत ३० लाख ठेवण्यात आली होती. पण दिल्लीच्या संघाने त्याच्यावर बोली लावायचे सोडले नाही. दिल्लीचा संघ त्याच्यावर बोली लावतच गेला आणि अखेर ३.८० कोटी रुपये मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. सर्वात महत्वाचे म्हणजे दिल्लीला आशुतोषची उपयुक्तता समजली आणि पहिल्या सामन्यात त्यांनी ती दाखवून दिली. सर्वाच महत्वाचे म्हणजे तो दिल्लीचे प्रशिक्षक केव्हिन पीटरसन यांचा लाडका खेळाडू आहे.




